पंकज गोपालराव तंरपाळे (रा. विकासनगर, बँक ऑफ इंडीया शेजारी, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार ए. एस. नवले यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पंकज तंरपाळे यांनी शुक्रवारी (दि. १२) देहूरोड येथील विकासनगर येथे भाषण करत असताना आर्थिक देवाण-घेवाण संदर्भात भाष्य केले. याबाबत खातजमा करून संबंधिताबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी रिपोर्ट आचारसंहिता कार्यालयात पाठविले. या संदर्भातील सीडी पोलिस निरिक्षक कल्याणकर यांनी ऐकली असता,त्यामध्ये
बीजेपीने एक हजार दिले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल शेळके हे आपणास पाच हजार रूपये देतील
असे संभाषण केले आहे. त्यामुळे संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक मोरे करीत आहेत.