७ मार्च २०२०
अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यातदरम्यान पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ अयोध्येतउभारण्यासाठी त्यांनी योगी सरकारकडे जागा देण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राम मंदिर होईल की नाही, ते कोण बनवेल याबाबत आधी चर्चा सुरु होती. तेव्हा शिवसेनेची मागणी होती की केंद्र सरकारने राम मंदिराच्या निर्मितीसाठी कायदा बनवावा, तो कायदा तर झाला नाही. मात्र, आता हा प्रश्न सुटला आहे. २०१८ मध्ये मी पहिल्यांदा इथं आलो होतो, त्यानंतर मी पुन्हा इथं येईल असं म्हटलं होतं. त्यामुळे आज पुन्हा अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले