५ फेब्रुवारी २०२०
केंद्राप्रमाणे राज्यातही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची राजपत्रिका अधिकारी महासंघाची मागणी लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाने तातडीने प्रस्ताव मांडावा हा आदेश दिला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येते महाराष्ट्र राज्य राजपत्रिका अधिकारी महासंघाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याच्या अध्येक्षत्वखाली बैठक झाली. नगरसेवक एकनाथ शिंदे, महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांच्यसह पदाधिकारी उपस्तिथ होते. या बैठलीत विविध मागण्या मांडण्यात आल्या, त्यामध्ये पाच दिवसचा आठवडा करण्याचा आग्रह महासंघाच्या वतीने धरण्यात आला. दिवसाच्या कामकाजाची ४५ मिनिटे वाढवून आणि अत्यावश्यक सेवा वगळून हा निर्णय घेता येऊ शकतो. कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही अश्या प्रकारचा प्रस्ताव सादर करावा. त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.