१६ नोव्हेंबर
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असून अवकाळी पावसामुळे शेतकरयांचे प्रचंड नुकसान झाले आहे ,
राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी 8 हजारांची तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत घोषित करण्यात आली आहे. राज्यपालांनी जाहीर केलेल्या या मदतीमुळे अवकाळी पावसाने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पंरतू ही किरकोळ स्वरुपाची मदत म्हणजे शेतकर्यांची एक प्रकारे केलेली थट्टाच म्हणावे लागेल.
शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विविध राजकिय पक्षांनी राज्यपालाना भेटून मदतीची मागणी केली होती तर काही राजकिय पक्षाचे प्रमुख शेतकर्यांच्या बांधावर जाऊन राज्यातील शेतकरयांना दिलासा देताना दिसले. अशातच आता राज्यपाल महाशयांनी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी ८ हजारांची प्रतिहेक्टरी मदत तर बागायत शेतीसाठी १८ हजार रुपयांची मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. याशिवाय नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा,विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेश देखील राज्यपालांनी दिले आहेत.