Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीरस्त्यावरील लढाईपासून न्यायालयीन लढाईसाठी 'रन फॉर मेरीट'

रस्त्यावरील लढाईपासून न्यायालयीन लढाईसाठी ‘रन फॉर मेरीट’

६ फेब्रुवारी २०२०

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय रन फॉर मेरीटचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रमुख तीस शहरांमध्ये एकाच वेळी हा उपक्रम राबवला जाणार आहे. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील पाषाणकर ऑटो चौकातून रविवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता या रन फॉर मेरिटची सुरुवात होईल आणि डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाजवळ समारोप होईल.

रन फॉर मेरीटचे उपाध्यक्ष विश्वजीत देशपांडे म्हणाले, ‘यामध्ये तरुण-तरुणी विद्यार्थी महिला व्यापारी असे खुल्या प्रवर्गातील विविध घटक सहभागी होणार असून मतांच्या राजकारणासाठी अत्याधिक आरक्षणाच्या धोरणाचा अवलंब केला जात आहे, पण यामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक तरुणांना डावलले जात. याविरोधात ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ सक्रिय असून रस्त्यावरच्या लढाईपासून न्यायालयीन लढाई पर्यंत सर्व प्रकारच्या संवैधानिक आयुधांचा वापर करत आहे. या लढाईचाच एक भाग म्हणून खुल्या प्रवर्गातील न्याय मिळवून देण्यासाठी रन फॉर मेरीट चे आयोजन करण्यात आले आहे.

रन फॉर मेरीटसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टी-शर्ट दिले जाणार असून अधिकाधिक विद्यार्थी महिला तरुण-तरुणी सर्व समाज घटकांनी रन फॉर मेरीट मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री विवेकानंद पाठक, डॉ सुश्रुत शहा, डॉ अर्चना चिंचवडकर, डॉ रेणुका धुर्वे, संजय गांधी, आनंद दवे, प्रशांत कौसडीकर, जयंत गौरकर, मदन सिन्नरकर, डॉ अर्चना अग्रवाल, महेंद्र लुनिया, धीरज ओस्तवाल, अमित कवी आदींनी केलेले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments