१७ फेब्रुवारी २०२०
भांडवलदारांच्या साठवणुकीमुळे मागील तीन महिन्यापुर्वी झालेल्या कांदा दरवाढीबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत उत्तर दिले होते की, मी ज्या कुटूंबातून आले आहे, त्या कुटूंबात कांदा खात नाहीत. आता गॅस दरवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित असे उत्तर देतील की, मी संसार करीत नाही, त्यामुळे माझ्यावर घरगुती गॅस दरवाढीचा परिणाम होणार नाही. अशा बेजबाबदार अर्थमंत्री व पंतप्रधानांना जनतेने सत्तेच्या खुर्चीवरुन खाली खेचले पाहिजे.
देशामध्ये महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, गृहिणी असे सर्व घटक चोहोबाजूंनी होरपळून निघत आहेत. असे असताना केंद्र सरकारने घरगुती गॅसची १४४ रुपयांची दरवाढ नागरिकांवर लादली आहे. २०१५ ला घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ४५० रुपये होती. आता तोच गॅस सिलिंडर १००० रुपयांचा टप्पा गाठत आहे. ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा देशभर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.
सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. 16) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी यांची होती उपस्थिती कयावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णुपंत नेवाळे, शाम अगरवाल, शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, बिंदू तिवारी, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवा दलाचे शहराध्यक्ष मकर यादव, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, सज्जी वर्की, सोशल मिडीया सेलचे अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, गौरव चौधरी, अनिरुध्द कांबळे, सुनिल राऊत, सतिश भोसले, बाबा बनसोडे, परशुराम गुंजाळ, दिपक जाधव, विश्वनाथ खंडाळे, वकिल प्रसाद गुप्ता, किशोर कळसकर, अक्षय शहरकर, समाधान सोरटे, महेश देवकाते, मयुर साखरे, सतिश कन्नड स्वामी आदी उपस्थित होते.
दरवाढी विरोधात बांगड्यांचा आहेर गरीजा कुदळे म्हणाल्या की, गॅस दरवाढ हा प्रश्न फक्त महिलांशी निगडीत नसून संपुर्ण कुटूंबाचा म्हणजेच देशातील सर्व नागरिकांशी संबंधित असा प्रश्न आहे. केंद्रात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना आताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी गॅस दरवाढी विरोधात बांगड्यांचा आहेर देत होत्या. आता त्यांनी तोच बांगड्यांचा आहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावा. यावेळी निगार बारसकर, विष्णूपंत नेवाळे, मयुर जयस्वाल यांनी केंद्र सरकारच्या निषेधाचे भाषणे केली.