‘केंद्रातील मोदी सरकारमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे. तसंच मोदी सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आलेले नाहीत. कोल्हापुरातील पूरस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे मदत करताना दिसत नाहीत. त्यानंतर आता विधानसभा निवडणुका आल्यानंतर मात्र ते प्रचाराला आले आहेत,’ असा आक्षेप घेत ‘मोदी परत जा’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड केला आहे.
सध्या हा ट्रेण्ड ट्विटरवर नंबर २ ला असून नेटकरी,खरपूस समाचार घेताना दिसत आहे,आजच मोदींची महाराष्ट्रात निवडणुकासाठांची प्रचार सभा होती पंरतू महाराष्ट्रातील जनता सोशल मिडायावरुन तर नाराजी दाखवत आहे.
महाराष्ट्र भाजपाला हा ट्रेण्ड तरी सध्या डोकेदुखी ठरतोय,
तरी भाजपच्या सोशल टिम जोरदार प्रत्युत्तर देत असून … २४ आॅक्टोबरला लागणारया निवडणुक निकालांवर याचा काही परिणाम होईल का..?