Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली 5 हजार कोटींची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली 5 हजार कोटींची मदत

२५ नोव्हेंबर
विधानसभेत आणखी बहुमत सिद्ध झाले नसतानाचं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारत राज्याच्या कारभाराला सुरवात केली आहे. आज त्यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या कामाला सुरवात केली आहे. पदभार घेतल्यानंतर त्यांनी कार्यालयात प्रवेश करताच पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली. दादर येथील कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्याच्या आप्तकालीन निधीतून 5380 कोटींची मदत दिली जाणर आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊस शेती, फळबागा, कपूस, ज्वारी, बाजरी अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी हा कर्जाच्या बोज्याखाली अडकला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून पहिली मात जाहीर करण्यात आली आहे. ही मदत लवकरात लवकरत शेतकऱ्याकडे पोहचवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांच्या मदतीने भाजपला पाठींबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments