23आॅक्टोबर
पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
द्रुतगती मार्गावर आज दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक असणार आहे.ओव्हरग्रेड गँन्ट्री बसवण्यासाठी हा बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खालापूर टोलनाक्यापासून ही वाहतूक पुण्याकडे वळवण्यात येईल. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर दोन तासांसाठी हा बंद असेल.
द्रुतगती मार्गावर गेल्या महिन्यातही दोन तासांसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गावर आतापर्यंत अनेक प्रवाशांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. या मार्गावर लेनची शिस्त मोडण्याच्या घटना सर्रास घडतात.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आज दोन तासांसाठी बंद
RELATED ARTICLES