Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीमा.लक्ष्मण जगताप यांच्या प्रचार सभेत पंकजाताई मुंढे यांच्या भाषण दरम्यान गोंधळ...

मा.लक्ष्मण जगताप यांच्या प्रचार सभेत पंकजाताई मुंढे यांच्या भाषण दरम्यान गोंधळ…

चिंचवड मतदारसंघातील भाजपा – सेना घटक पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार मा. लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप -शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजप खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अभिषेक बारणे, कैलास बारणे, नगरसेविका माया बारणे, अर्चना बारणे, झामाबाई बारणे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे सर्व नगरसेवक, भाजप, शिवसेना,घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीला साधा उमेदवार सुद्धा देता आले नाही. त्यामुळे निवडणुकीत त्यांचा आधीच पराभव झालेला आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेताना खास करुन कलम ३७०चा पुन्हा एकदा विषय छेडला, राष्ट्रवादीस पिपंरी चिचंवड मतदार संघात उमेदवार सापडत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडणुक येतील असा विश्वास व्यक्त केला…..!
या दरम्यान उपस्थित नागरिंकांतील काहीनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला स्थानिक प्रश्नांला अनुसरुन त्यांचे प्रश्न होते,
दरम्यान पोलिसांनी गोधंळ घालणार्या नागरिकांना सभेबाहेर काढले,लोकशाहीत अशा गोष्टी अपेक्षितच आहे असे म्हणत पंकजाताई मुंडे
यांनी आपले भाषण पुर्ण केले .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments