६ नोव्हेंबर
महिलेचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी महिलेनं
चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुनील बांबू असं तरुणाचं नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील बांबू (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यानं फेसबुकवर बनावट खाते उघडून त्यावर एका महिलेचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो अपलोड केले. मार्च २०१८ ते ४ नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी सुनील यानं फेसबुकवर एक बनावट खातं उघडलं. प्रोफाइल फोटो म्हणून संबंधित महिलेचा फोटो अपलोड केला. तसंच कव्हर फोटो म्हणून पीडितेचा अर्धनग्न अवस्थेतील फोटो ठेवला. याशिवाय महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर शेअर करून बदनामी केली. ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेनं पोलिसांत धाव घेतली. तिनं चाकण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी सुनील याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुासर गुन्हा दाखल केला आहे.
महिलेचे अर्धनग्न फोटो फेसबुकवर शेअर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
RELATED ARTICLES