२५ आॅक्टोबर
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ सर्व जागांचे अंतिम निकाल अखेर हाती आले आहेत. तब्बल १६ तासांच्या मॅरेथॉन मतमोजणीनंतर रात्री साडेबारा वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.
सर्व जागांचे निकाल लक्षात घेतल्यास भाजप हा १०५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनंतर मित्रपक्ष शिवसेना दुसऱ्या स्थानी असून शिवसेनेने ५६ जागी विजय संपादन केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुसंडी मारली असून ५४ जागा जिंकल्या आहेत. राज्यात नेतृत्व आणि प्रचारात कमकुवत राहिलेल्या काँग्रेसने आतापर्यंत ४४जागा जिंकल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरील रात्री १२.३० वाजताच्या अपडेट्सनुसार पक्षनिहाय संख्याबळ.
पुढीलप्रमाणे:
पक्षीय बलाबल
भाजप- १०५
शिवसेना – ५६
राष्ट्रवादी काँग्रेस- ५४
काँग्रेस- ४४
बहुजन विकास आघाडी- ३
एमआयएम- २
समाजवादी पार्टी- २
प्रहार जनशक्ती पार्टी- २
माकप- १
जनसुराज्य शक्ती- १
क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १
शेतकरी कामगार पक्ष- १
राष्ट्रीय समाज पक्ष- १
स्वाभिमानी पक्ष- १
अपक्ष- १३
एकूण जागा- २८८
महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांचे निकाल जाहीर
RELATED ARTICLES