२० नोव्हेबंर
आज महाराष्ट्राच्या दृष्टीने दिल्लीत राजकीय हालचालींना जरा वेग आला. आधी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन राज्यातील “विविध प्रश्नांवर चर्चा केली”, असं सांगण्यात आलं.त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, नसीम खान आणि जयराम रमेश यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आणि मग या सर्व काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर शरद पवार यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी बैठक झाली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिक यांनी सांगितलं, “चर्चा अजूनही चालू आहे. आज किंवा उद्या चर्चा सुरू असेलच आणि महाराष्ट्राला लवकरच एक स्थिर सरकार मिळेल. गेल्या 21 दिवसांत महाराष्ट्रातली राजकीय अस्थिरता संपुष्टात येईल.”