महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरावर
७ मार्च २०२०,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्येत दाखल होत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हेदेखील असणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, उद्धव ठाकरे यांचा हा अयोध्येचा तिसरा दौरा आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शरयू आरतीला उपस्थित राहणार नाहीत. तसंच इथं कोणत्याही प्रकारची सभा होणार नाही. उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होण्यापूर्वीच इथं मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल होत आहेत. शिवसैनिकांना घेऊन एक विशेष रेल्वे मुंबईहून अयोध्येला दाखल होत आहे. तसंच उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांतूनही शिवसैनिक अयोध्येत पोहचत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरावर
RELATED ARTICLES