Wednesday, June 18, 2025
Homeउद्योगजगतमहात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीसह भाजपचा १६ सूत्री...

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीसह भाजपचा १६ सूत्री जाहीरनामा प्रसिद्ध

१५ ऑक्टोबर २०१९
भाजपनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी १० वाजता त्यांचा जाहीरनामा १६ सूत्री कार्यक्रम या निमित्तानं जनतेसोमर मांडला आहे. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा, सरचिटणीस आणि प्रभारी सरोजिनी पांडे उपस्थित होते.

भाजपच्या संकल्प पत्रातील प्रमुख मुद्दे
-दुष्काळमुक्त महाराष्ट्र करणार
-मराठवाडा वॉटर ग्रिडची स्थापना करणार.
-दुष्काळी भागात पुढच्या पाच वर्षांत पाणी पोचवणार. उद्योग, शेतकरी यांना पाणी देणार.
-प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचं पाणी देणार.
-शेतीला 12 तास दिवसाची वीज देणार, सौर ऊर्जेवर आधारित ही वीज असेल.
-5 वर्षांत 1 कोटी नोकऱ्या देणार.
-पायाभूत सुविधांसाठी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक.
-मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 30 हजार किमीचे ग्रामीण रस्ते बांधणार.
-रस्त्यांच्या देखभालीसाठी विशेष यंत्रणा राबवणार.
-2022 पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेघराला घर देणार.
-जनआरोग्य योजनांतून 90 टक्के लोकसंख्या आरोग्यसेवेच्या कवचाखाली आणणार. 90 टक्के जनतेला मोफत उपचार देणार.
उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणार.
-सर्व कामगारांची नोंदणी करून त्यांना सामाजिक सुरक्षेच्या योजना लागू करणार.
-माजी सैनिक आणि शहिदांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याच्या योजना आणणार.
-प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी कालबद्ध कार्यक्रम.
-महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि सावरकरांच्या भारतरत्नासाठी पाठवुरावा करणार.
-2020 पर्यंत आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करणार.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments