२१ ऑक्टोबर २०१९
पिंपरी मतदार संघातील पिंपरी गाव येथील विद्यानिकेतन शाळेतील बुथ क्रमांक ३०३ येथे काही परप्रांतीयांनी मराठी मतदारांच्या नावावर बोगस मतदान केल्याची माहिती समोर आली. या परप्रांतीयांनी बोगस ओळखपत्रे दाखवून मतदान केल्याची बाब उघड झाली. आमदार गौतम चाबुकस्वार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पाच जणांना पोलिसांच्या ताब्यात देऊन बोगस मतदान होत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली.यामुळे पिंपरी गावातील मतदान केंद्रावरचे वातावरण विस्कळीत झाले आहे. पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱयांनी येथे गर्दी केली.
मराठी मतदारांच्या नावावर परप्रांतीयांनी केले बोगस मतदान पाच जण ताब्यात
RELATED ARTICLES


