पहिला मराठी रॅपर किंग जे.डी म्हणजेच श्रेयश जाधवला नुकतंच विदर्भ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आर. पी. समर्थ स्मारक समितीच्या वतीने त्याला हा सन्मान मिळाला आहे. मराठी सिनेसृष्टीतील पहिला मराठी रॅपर असलेल्या श्रेयशने केवळ रॅपच केलं नसून त्याने निर्मिती आणि दिग्दर्शकीय क्षेत्रातदेखील नशीब आजमावलं आहे.
मराठी सिनेसृष्टीत रॅपचा पायंडा घालून देणाऱ्या श्रेयशनं ‘ऑनलाईन- बिनलाईन’, ‘बसस्टॉप’, ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटांची निर्मिती केली. तर, ‘मी पण सचिन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. विशेष म्हणजे श्रेयशने रॅपच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य केलं आहे. त्यामुळेच विदर्भात जन्मलेल्या श्रेयशचा सिनेसृष्टीतील हा यशस्वी प्रवास पाहता. त्याच्या कार्याची दखल घेत त्याला ‘विदर्भ रत्न’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
लवकरच श्रेयश ‘मनाचे श्लोक’, ‘फकाट’, बघतोस काय मुजरा कर 2′, ‘मीटर डाऊन’ असे भन्नाट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.