२४ नोव्हेंबर
पहील्या दिवस रात्र भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाता इथं सुरु असलेल्या ऐतिहासिक क्रिकेट कसोटीत भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. काल भारतानं आपला पहिला डाव ९ बाद ३४७ धावांवर घोषित केला. बांगलादेश आज आपला दुसरा डाव ६ बाद १५२ धावांवरून पुढे सुरु करणार असून; अजूनही ते ८९ धावांनी पिछाडीवर आहेत.
ईशांत शर्मानं ४ तर उमेश यादवनं दोन गडी बाद केले. पहिल्या दिवस–रात्र क्रिकेट कसोटीत शतक ठोकणारा विराट कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर पडलेल्या बांगलादेश संघाची दुसऱ्या कसोटी सामन्यातही खराब सुरुवात झाली. पहिल्या डावात पाच विकेट्स घेणाऱ्या ईशांत शर्माने पुन्हा एकदा कमाल दाखवली. त्याने शादमान इस्लामला खातंही उघडण्याची संधी दिली नाही. यानंतर डावातील तिसऱ्या षटकातच मोमिनुल हकलाही शून्यावर माघारी पाठवलं. यानंतर उमेश यादवने मोहम्मद मिथुनला बाद केलं. इमरुल कायेसने जम बसवण्याचा प्रयत्न केला. पण तो जास्त धावा करणार नाही याची काळजी ईशांत शर्माने घेतली.
भारत आता केवळ ४ विकेट विजयापासून दूर आहे.