१० डिसेंबर,
केंद्र सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी व महागाई वाढली आहे. जीएसटी व नोटा बंदीच्या निर्णयामुळे औद्योगिक उत्पादन ठप्प झाले असून देशाचा जीडीपी घसरला आहे. मागील साडेपाच वर्षात केंद्र सरकारने शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतमालाला दिडपट हमी भाव दिला नसल्यामुळे कर्जबाजारी शेतक-यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. कामगारांच्या न्याय्य हक्कांवर अतिक्रमण करणारे ‘‘नीम’’ धोरण राबवून केंद्र सरकारने कामगारांचे आर्थिक, शारिरीक व सामाजिक शोषण केले आहे. एम्स आणि आयआयटीच्या दर्जाचे महाविद्यालय देशभर उभारू असे आश्वासन दिले होते, ते देखील पूर्ण केले नाही. तरुणी व महिलांवरील अन्याय, अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होतच आहे. देशाची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. याच्या निषेधार्थ अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भारत बचाव रॅली’त पिंपरी चिंचवड शहरातून कॉंग्रेसचे शंभर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिली.
शनिवारी (14 डिसेंबर) दिल्लीतील रामलीला मैदान ते संसदभवन मार्गावर अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातून शंभर कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. याच्या पूर्व तयारीची बैठक सोमवारी (9 डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरण आकुर्डी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकारी बिंदू तिवारी, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, दिलीप पांढारकर, मेहताब इनामदार, सुनील राऊत, ॲड. मोहन आडसूळ, विश्वनाथ खंडाळे, हरीदास नायर, माधव पूरी, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, गौरव चौधरी, एन.पी. रवी, दीपक जाधव, किशोर कळसकर, हुरबानो शेख, परशुराम गुंजाळ, मीनाताई गायकवाड, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, मोहन अडसूळ, कुंदन कसबे, व्ही.एस.कबीर, विठ्ठल कळसे, अनिल बिरादार, वसीम शेख, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.