Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीभारतातील पहिलेच भिक्षेकऱ्यांचे अनोखे चित्र प्रदर्शन

भारतातील पहिलेच भिक्षेकऱ्यांचे अनोखे चित्र प्रदर्शन

१६ ऑक्टोबर २०१९
आयुष्यात भीक मागण्याची वेळ कुणावर येवू नये…!
आपला आत्मसन्मान विकून भीक मागायला लागणं हे त्याहून मोठं दुःख …!
पुर्वी भीक मागणारा एक मुलगा … याला माणसांत यायचंय…! चित्रकार म्हणुन सन्मानानं जगायचंय… !
याला बोटं आणि तळहात नाहीत… म्हणुन, “नशिबाची” कुठलीही “रेषा” याच्या हातावरही नाही…
तरीही, यानं या हातावर नसलेल्या “रेषांनाच”, “नशीब” बनवलंय… कागदावर चितारलंय…!
हे प्रदर्शन आहे… आस्तित्वात नसलेल्या अशा रेषांचं…!!!
हे प्रदर्शन फक्त चित्रांचं नाही… हे प्रदर्शन आहे एका जिद्दीचं… !

डॉक्टर्स फॉर बेगर्स , या प्रकल्पा अंतर्गत डॉ.अभिजीत सोनवणे यांनी भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी हा नाविन्यपूर्ण प्रकल्प पुण्यात सोहम या संस्थेमार्फत सुरु केला. पुण्यातील ११०० भिक्षेकऱ्यांवर रस्त्यावर उपचार सुरु असताना या प्रकल्पांतर्गत ५७ भिक्षेकऱ्याना भीक मागणं सोडायला लावून डॉ.अभिजीत सोनवणे यांनी रोजगार उपलब्ध करून दिला , भिक्षेकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे असे प्रदर्शन भरवणे हि भारतातील पहिलीच घटना आहे, असे डॉ. अभिजीत सोनावणे म्हणाले.

भिक्षेकऱ्यानी बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री.
कुठे
पी. एन. गाडगीळ ज्वेलरी शॉप,रिलायन्स मॉल शेजारी, औंध पुणे.
केव्हा
१७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ८

सोमवार ते शनिवार रोज सकाळी १०-४ वाजेपर्यंत धार्मिक स्थळांबाहेर, वैद्यकीय उपचार करत भीक मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांनी भीक मागणे सोडावे यासाठी त्यांच्याशी संवाद साधून, स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जगण्यासाठी डॉ. अभिजीत सोनावणे त्यांना प्रोत्साहन देतात व मदत करतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments