१३ फेब्रुवारी २०२०
भारत हा एक विकसनशील देश असून भारत -अमेरिका मैत्री दिवसेंदिवस वाढ होत आहे , अशातच काही दिवसांपूर्वी अमेरिका मध्ये “ मोदींच्या स्वागतासाठी “ हाऊडी मोदी” या भव्य कार्यकर्माचे अमेरिकेत आयोजन केले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुजरात दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या मार्गातील झोपड्या दिसू नयेत म्हणून अहमदाबाद महापालिकेने एक खास भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या झोपडपट्ट्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि इंदिरा ब्रिज या भागात आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक रोड शो ह्या दौऱ्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मार्गातल्या झोपड्या लपवण्यासाठी भिंत बांधली जाते आहे.
अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौरयावर येत असून , त्यांना भारतातील दारिद्रय दिसू नये म्हणून भारत सरकार गरिबी लपवण्यासाठी त्यांच्या मार्गातील गरिब वस्त्यांना भिंत घालून गरिबी लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
अहमदाबाद महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार तूर्तास अर्धा किलोमीटरची भिंत उभारली आहे. या भिंतीची उंची सहा ते सात फूट आहे. “मला अशा कोणत्याही बांधकामाची माहिती नाही, मी असं काहीही बांधकाम पाहिलेलं नाही” असे अहमदाबाद महापालिकेच्या महापौर बिजल पटेल यांनी म्हंटले आहे.