३१ जानेवारी २०२०,
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. तिसऱ्या टी-२० सारखाच चौथा टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये १३ धावा केल्या. विजयाचे लक्ष्य भारताने ५व्या चेंडूवर पार केले. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. विजयाचा चौकार; भारताचा पुन्हा सुपर ओव्हरमध्ये विजय
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात न्यूझीलंडला विजयासाठी १६६ धावांचे आव्हान दिले होते. टिम सेइफर्टने ५७ धावा करत न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहोचवलो. २०व्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी ७ धावा हव्या होत्या. पण भारताच्या शार्दुल ठाकूरने कमाल केली. त्याने अखेरच्या षटकात दोन विकेट घेतल्या आणि फक्त ६ धावा दिल्या त्यामुळे दोन्ही संघांच्या समान धावा झाल्या.
सुपर ओव्हरमधील पराभव काही केल्या न्यूझीलंडची साथ सोडताना दिसत नाही. भारताविरुद्ध बुधवारी सुपर ओव्हरमध्ये सामना हरल्यानंतर न्यूझीलंडने पुन्हा एकदा शुक्रवारी सुपर ओव्हरमध्येच सामना हरला. २०व्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी ७ धावांची गरज होती. पण त्यांना ६ धावाच करता आल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने ही ओव्हर टाकली आणि या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या ४ विकेट पडल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने दिलेले १४ धावांचे लक्ष्य भारताने १ चेंडू राखून पार केले.