३० ऑक्टोबर
भाजप विधिमंडळ नेतेपदासाठी चंद्रकांत पाटलांनी मांडला देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव. या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवारांनी अनुमोदन दिलं. या बैठकीसाठी सर्व भाजप आमदार भगवे फेटे घालून विधान भवनात आले होते.
मुनगंटीवारांसह संजय कुटे, हरीभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे-पाटील, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार, गणेश नाईक, सुरेश खाडे, देवयानी फरांदे, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन केलं.
लवकरच महायुतीचे सरकार स्थापन करणार करू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, दरम्यान आपल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे याचे आभार मानले. याद्वारे आता भाजपाकडून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.
भाजप विधिमंडळ नेतेपदासाठी देवेंद्र फडणवीसांची एकमताने निवड
RELATED ARTICLES