९ नोव्हेंबर
काल मुख्यमंत्र्यानी राजीनामा दिल्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रित केले.
त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला सत्तापेच आता निर्णायक टप्प्याकडे पोहोचला आहे.
निवडणुकीपूर्वी युती केलेले भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचानंतर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा कोश्यारी यांना दिला होता.
“राज्यपालांनी दिलेलं निमंत्रण हे घटनात्मक पद्धतीचा भाग आहे. उद्या कोअर टीमच्या बैठकीत त्यावर निर्णय होईल,” असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
दरम्यान भाजपाने १८ इतर आमदार आमच्या संपर्कात आहे असा दावा केला आहे.
भाजपाला सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निमंत्रण
RELATED ARTICLES