मुंबई 24 ऑक्टोंबर
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता फक्त काही तास राहिलेत. अवघ्या काही तासांमध्ये राज्यातलं चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वच एक्झिट पोल्समध्ये महायुतीला मोठं यश मिळणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. भाजप-शिवसेना 200 पार करणार असं जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी सांगितलंय. त्यामुळे भाजपने विजयी जल्लोषाची तयारी सुरू केलीय. मिठाई, फटाके आणि ढोल ताशांची सोय करण्यात आलीय. नरिमन पॉईंट इथं असलेल्या भाजपच्या मुख्यालयाबाहेर व्यासपीठही उभारण्यात येणार असून दिग्गज नेते इथे उपस्थित राहणार.
दरम्यान आज लागणार्या विधानसभा निकालांचे सर्व ताजे अपडेटस् मिळवण्यासाठी न्यूज १४ च्या वेब साईटला भेट द्या. http://www.news14pimprichinchwad.com