Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीभरधाव वेगात ट्रक घुसला झोपडीत, अपघातात दोघांचा मृत्यू,

भरधाव वेगात ट्रक घुसला झोपडीत, अपघातात दोघांचा मृत्यू,

२५ ऑक्टोबर
काल शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मोशी येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक दुभाजक ओलांडून झोपडीत घुसला.या अपघातात ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.इरफान महम्मद जमादार पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. तर बोबी बनारसी सोळंकी (११) असे मयत मुलाचे नाव असून बेबी बनारसी सोळंकी (३६) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेप्रकरणी बनारसी रणजित सोळंकी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बनारसी हे त्यांच्या मयत मुलगा आणि पत्नीसह झोपडीत झोपले होते. तसेच इतर व्यक्ती देखील होते. तेव्हा, रात्री दीडच्या सुमारास पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून जवळच असलेल्या झोपडीत घुसला. या अपघातात बोबीचा जागीच मृत्यू झाला, त्याची आई गंभीररित्या जखमी झाली आहे.
मोशी परिसरात चाकणहुन पुण्याच्या दिशेने ट्रिपल सिट काही तरुण स्कुटीवर जात होते. तेव्हा, पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने स्कुटीला धडक दिली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या तरुणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments