३ फेब्रुवारी २०२०
मा.महापौर यांनी भक्ती शक्ती येथील पुलाच्या कामाचा आढावा घेतला.पुलाचे काम १मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. याकरिता ठेकेदाराने तीन पाळी मध्ये काम करावे.तसेच अधिकाऱ्यांनी त्यानुसार नियोजन करून दर १५दिवसांनी अहवाल द्यावा.यावेळी सत्तारूढ पक्षनेते श्री.एकनाथ पवार स्थानिक नगरसदस्य/नगरसदस्या श्री.सचिन चिखले , उत्तम केंदळे ,अमित गावडे सुमनताई पवळे, कमलताई घोलप, शर्मीलाताई बाबर उपस्थित होते.
सह शहर अभियंता श्रीकांत सवने यांनी शहराचे प्रवेशद्वार असल्याने व भविष्यातील पावसाळा ,पालखी आगमन, वाहतूक वळण, व नागरिकांच्या अडचणीचा विचार करता प्रकल्प महापौरांच्या आदेशानुसार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व नियोजन करणेत येत आहे.