२५ ऑक्टोबर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेनं महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यावरून भाजपवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहे असे दिसते, शिवसेनेनं ‘कार्टुन’ हल्ला चढवून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला . शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं असून, ‘बुरा न मानो दिवाली है’ अशी ओळ पोस्ट केली आहे. त्यात वाघाच्या हाती कमळ असून, तो वाघ कमळाला हुंगत आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रात वाघाच्या गळ्यात घड्याळ दाखविण्यात आले आहे.
यामधून सरकार स्थापन करेपर्यंत भाजपवर दबाव निर्माण करण्याची शिवसेनेची रणनीती असल्याचं मानलं जात आहे.
शंभरच्या जवळपास जागा जिंकणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष पाठिंबा देतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘शिवसेना आमचा मित्रपक्ष नाही,’ असं सांगून या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला तरी, शिवसेनेनं सत्तेत समान वाटा घेण्याची भूमिका मांडली असल्यानं आता सत्ता स्थापन होईपर्यंत महायुतीत कुरबुरी सुरू राहतील.
” बुरा न मानो दिवाली है” कार्टूनच्या माध्यमातून शिवसेनेने साधला भाजपावर निशाणा
RELATED ARTICLES