१३ नोव्हेंबर
बालदिनानिमित्त 5 ते 12 वयोगटातील बालकांनी किल्ले रायरेश्वरावर भटकंतीचा आनंद लुटला. 40 मुलांनी यात सहभाग घेतला होता. इंडियाट्रेक्स संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले होते.
मोबाईल फोनमध्ये गुंतून जाणाऱ्या बालकांना निसर्गाचे सान्निध्य लाभावे या हेतून या भटकंतीचे आयोजन केले होते. 9 नोव्हेंबर रोजी पहाटे बालकांनी प्रवास सुरू केला. नसरापूर-भोर-वेल्हा मार्गे रायरेश्वरच्या दिशेने ते मार्गस्थ झाले. संस्थेचे मार्गदर्शक सुरक्षा सामुग्रीसहित सहभागी झाले होते. बालकांना किल्ल्याचा इतिहास समजावून सांगण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी येथील शिवलिंगास साक्षी ठेवून स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ आणि त्यानंतरचा इतिहास सांगण्यात आला.
रायरेश्वराच्या पठारावर भटकंती केल्यानंतर मुलांची छोटेखानी परीक्षा घेण्यात आली. इंडिया ट्रेक्सचे संस्थापक सर्वेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात आणि इंडिया ट्रेक्स टीमच्या सदस्यांनी संयोजन केले.
मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने रविवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी पुन्हा या मोहिमेचे आयोजन केलेले आहे. इच्छुकांनी त्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी मयूर – 7588053616 आणि श्वेता – 8149321909 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.