Saturday, September 30, 2023
Homeउद्योगजगतबायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकल्याबद्दल भोसरीतील मंकीकर हाॅस्टीपटला दंड

बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकल्याबद्दल भोसरीतील मंकीकर हाॅस्टीपटला दंड

१० डिसेंबर
पुणे नाशिक रस्त्यालगत आपटे कॉलनी परिसरात असणाऱ्या मंकिकर मुलांचे हॉस्पिटलला धोकादायक बायोमेडीकल वेस्ट उघड्यावर टाकणे चांगलेच महागात पडले आहे. हा कचरा उघड्यावर टाकल्याने या हॉस्पिटलकडून तब्बल २५ हजार रूपयांचा दंड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी के. अनिल रॉय यांनी दिली.

हॉस्पिटल तसेच रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बायोमेडीकल वेस्ट तयार होते. त्यात इंजेक्शन, सलाईन, ऑपरेशननंतरचे शरीराचे अवयव, रुग्णांसाठी वापरण्यात आलेले बँडेज तसेच रुग्णालयात तयार होणाऱ्या कचऱ्याचा समावेश आहे. कायद्याने या कचऱ्याची शासरोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णालयांकडे ही यंत्रणा नाही. परंतु महापालिकेनेच शहरातील रुग्णालयांसाठी सशुल्क स्वरुपात ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शहरातील रुग्णालयांची नोंदणी करून त्यांना ही सुविधा दिली जाते. मात्र, त्यानंतरही काही रुग्णालयांकडून पैसे वाचविण्याच्या नादात हे वेस्ट कचरा पेटीत टाकले जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

डॉ. रॉय म्हणाले, भोसरी- नाशिक रस्त्यालगत कुंडीमध्ये कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंजेक्शनच्या सुया तसेच बायोमेडीकल वेस्ट आढळून आले. त्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. आरोग्य निरीक्षक तसेच सहायक आरोग्य निरीक्षकांनी या कचऱ्याची तपासणी केली असता, त्यात मंकिकर मुलांचे हॉस्पिटलच्या रिसिट तसेच औषधांच्या चिठ्या आढळून आल्या. यानंतर संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून शहरातील दंड वसूल करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments