१६ ऑक्टोबर २०१९
रक्तदान आहे जीवनदान, ते वाचवते दुसऱ्याचे प्राण
रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाचे प्राण वाचू शकतात त्यामुळे आपल्याकडे नेहमी रक्तदानाचे आवाहन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का? की प्राणीही प्राण्यांसाठी रक्तदान करतात. जगात असे अनेक देश आहेत जिथे ‘पेट्स ब्लड बँक’ आहेत.
जर एखादे कुत्र किंवा मांजर आजारी पडले वा जखमी झाले तर त्याला रक्त देण्यासाठी अशा ब्लड बँक उपयोगी पडतात.
जर प्राणीही आपल्या बांधवांना रक्तदान करीत असतील तर आपण माणसांनी ते करणे किती अपेक्षित आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मांजरांमध्ये ३ प्रकारचे रक्तगट असतात तर कुत्र्यांमध्ये बारा प्रकारचे रक्तगट असतात. अमेरिकेतील एका पेट्स ब्लड बँकेचे डॉ. के.सी. .मिल्स यांनी सांगितले कि, कॅलिफोर्नियातील डिक्सन आणि गार्डन ग्रोव्ह शहर तसेच अन्यही ठिकाणी अशा ब्लड बँक उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी बरेच हौशी लोक आपल्या पाळीव प्राण्यांना नेऊन रक्तदान करतात.


