निवडणूक आयोगाचा दणका । सभा, प्रचार, प्रचारफेरीत दिसल्यास गमवावी लागणार नोकरी,
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कडक निर्बंध घातले आहेत, यानुसार कोणत्याही प्रचारसभेत किंवा प्रचारफेरीत शिक्षक दिसल्यास, त्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. अगदी खासगी शिक्षण संस्थांनाही याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
मागील निवडणुकांचा आढावा घेतल्यास, ज्या राजकीय मंडळींच्या शिक्षण संस्था आहेत, तेथील शिक्षकांना प्रचारासाठी पाठविले जाते. त्यांच्यावर सभा, प्रचारफेरी, व्यवस्थापन अशा जबाबदाºया सोपविल्या जातात. मात्र, आता ते शक्य होणार नाही आणि चुकून एखादा शिक्षक प्रचार, सभेत आढळल्यास त्याला नोकरी गमवावी लागेल, शिवाय उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रारही दाखल होऊ शकते.
प्रचारसभा, बैठकांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. अशा चित्रीकरणात शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकारणात वावरणाºया शिक्षकांवर टाच येणार आहे.
प्रचारात ‘गुरुजी’ दिसल्यास कारवाई
RELATED ARTICLES