१९ ऑक्टोबर २०१९
पिंपरी चिंचवड शहरवासीयांना आता मतदानाच्या दिवसाची उत्सुकता लागली आहे, कारण जवळपास दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज शनिवारी संध्याकाळी ६वाजता सांगता झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहिचण्याचा निर्णय घेऊन निघालेल्या राजकीय पक्षातील नेत्यांची रॅली पावसाने विस्कळीत केली. त्यामुळे प्रचाराचा अंतिम गाजवला तो पावसानेच.आरोप प्रत्यारोप आणि वैचारिक किंवा विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी नेत्यांनी गाठलेली खालची पातळी यामुळे यंदाच्या प्रचाराला निराळेच स्वरूप आले. प्रचाराला कमी वेळ असल्याने प्रचारात एकूणच रंगत निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
प्रचाराच्या तोफा थंडावल्या -पावसामुळे उमेदवारांची निराशा..
RELATED ARTICLES