१९ नोव्हेंबर
पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. आता २५ नोव्हेंबर पासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पवना धरण १०० टक्के भरलेले असताना देखील महापालिकेकडून हा अघोरी निर्णय घेण्यात आला आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज मंगळवार रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त म्हणाले की, येत्या २५ नोव्हेंबर पासून शहरात महापालिकेकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.पाणी उपलब्धता वाढवणे व समन्यायीन पाणी वाढवणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.