Friday, June 21, 2024
Homeताजी बातमीपुण्यात इंटरनॅशनल सेक्स रॅकेट उघड

पुण्यात इंटरनॅशनल सेक्स रॅकेट उघड

७ मार्च २०२०,
मॉन्टी उर्फ जगन्नाथ अर्यल हा एस्कॉर्टच्या माध्यमातून पुण्यात वेश्याव्यवसाय करवून घेतो, अशी माहिती समोर आली आहे. जगन्नाथ अर्यल याने एस्कॉर्ट नंबरवर बनावट ग्राहकाद्वारे संपर्क साधून एका परदेशी महिलेला शिवाजीनगरच्या जवळ असेल्या सेंच्युरियन हॉटेलमध्ये पाठवलं होतं. तिथं ही महिला सापडल्याने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

पोलिसांना सापडलेली सदर पिडीता उझबेकिस्तान देशाची असून तिची सुटका करण्यात आली. सदर महिलेकडून मिळालेल्या माहितीवरून बिझ्झ तमन्ना हॉटेल हिंजवडी फेस 1 येथून 5 पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर 5 पीडित महिलांपैकी 1 उझबेकिस्तान, 1 कझाकिस्तान, 1 नेपाळ, 1 ओडिसा आणि 1 पंजाब येथील राहणाऱ्या आहेत.

सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या महिलांना तमन्ना हॉटेलमधून ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर 6 पीडीत महिलांना (2 उझबेकिस्तान, 1 कझाकिस्तान, 1 नेपाळ, 2 इतर राज्यातील) रेस्क्यू होम येथे ठेवण्यात आले आहे.

नागपूरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा दोन दिवसांपूर्वी पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सेक्स रॅकेटमध्ये सुशिक्षित तरुणींचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. स्वतःचे महागडे हौस पूर्ण करण्या साठी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणींना गुन्हे शाखेने सोडवलं.

इंदोर आणि कोलकाता मधून या तरुणींना नागपुरात शरीरविक्रीच्या व्यवसायासाठी आणण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. नागपुरातील सीए रोड परिसरातील हॉटेल ओयो टाऊनमध्ये छापेमारी करत या काळ्या बाजाराची पोल खोल गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments