१ नोव्हेंबर
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ताडीवाला रोड च्या पार्किंग मध्ये एक हॅण्डग्रेनेड सदृश वस्तू आढळून आली असून,
त्यामुळे स्टेशन परिसरात खळबळ उडाली होती, पुणे पोलीस व बॉम्ब शोधक पथकच्या चाललेल्या सुमारे ४ तासच्या अथक प्रयत्ननानंतर ते निकामी करण्यात यश आले . या नंतर हि माहिती त्वरित पुणे लष्कराला देण्यात आली असून, पुढील तपासासाठी काही नमुने फॉरेन्सिक लॅब ला पाठवले आहेत.
आज सकाळी एका सफाई कामगाराला हि हॅण्डग्रेनेड सदृश वस्तू आढळून आल्यानंतर त्वरित पोलीसानां हि माहिती दिली व कारवाई केली गेली.
दरम्यान अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हि वस्तू आढल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले होते. हे हॅण्डग्रेनेड निकामी करण्यात यश आले असून,यावेळी सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे पाहणी केली.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आढळले हॅण्डग्रेनेड
RELATED ARTICLES