११ मार्च २०२०,
पुण्यात ‘कोरोना’चे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पुणे महापालिकेने युद्ध स्तरावर कामाला सुरुवात केलीय. कोरोनाच्या रुग्णांसाठी वेगळ्या हॉस्पिटलची आणि आयसोलेशन वॉर्डसची गरज असल्याने अवघ्या काही तासांमध्ये पालिकेने 200 खाटांची व्यवस्था केली असून लवकरच हे तात्पुरतं हॉस्पिटल सुरु होणार आहे. राजयोग सोसायटी आणि सणस मैदानातील इमारतीत हे तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची महिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. विभागीय आयुक्तालृयात तातडीची बैठक झाली. यात विभागीय आयुक्त, कलेक्टर, पालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी बैठकीत हजर आहेत. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरूअसून त्यांना खास वॉड्समध्ये ठेवण्यात येणार आहे.
देशातल्या इतर राज्यांनंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाव्हायरस (Coronavirus) पोहोचला आहे. पुणे शहरात कोरोनाव्हायरसचे ५ रुग्ण सापडलेत.