२४ ऑक्टोबर
पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ६१८ मतांनी विजय झाला आहे.
त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना पराभवाची धूळ चारत मागील पराभवाचे उट्टे काढत पुन्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा झेंडा पिंपरीत फडकावला, पिंपरीत शिवसेनेचे विद्यमान आमदार उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना राष्ट्रवादीचे माझी आमदार आण्णा बनसोडे झुंजवत ठेवले होते.
परंतु जनतेला बदल हवा होता तो झाला.अण्णा बनसोडे यांना एकूण ८६८७३ मते पडली तर गौतम चाबुकस्वार यांना ६७०५७ मते पडली, राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे हे १९६१८ मतांनी विजयी आहेत.
पिंपरीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकला , राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विजयी
RELATED ARTICLES