Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीपिंपरी येथील फुलबाजाराचे महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते उदघाटन

पिंपरी येथील फुलबाजाराचे महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते उदघाटन

७ नोव्हेंबर
नविन झालेल्या फुलबाजारामुळे शगुन चौकातील वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २० मधील पिंपरी क्रोमा शॉपींगमॉल जवळील मोकळया जागेत उभारण्यात आलेल्या फुलबाजाराचे उदघाटन महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. फुल व्यापारी शगुन चौकात रस्त्यावर बसुन व्यापार करत होते, त्यानंतर व्यापा-यांच्या संख्या वाढल्यामुळे वाहतुकीस मोठया प्रमाणावर अडथळा होत होता. फुल व्यापारा-यांच्या हक्काच्या जागेबाबत त्यांची सतत मागणी होत होती, त्यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेने क्रोमा शॉपींगमॉल जवळील मोकळया जागेत तात्पुरते पत्र्याचे गाळे उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच भविष्यात काही अडचणी उदभवल्यास महापालिकेमार्फत सोडविल्या जातील असेही ते म्हणाले.

आज दुपारी झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, स्विकृत सदस्य माऊली थोरात, ह प्रभाग नामनिर्देशित सदस्य कुणाल लांडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रदिप पुजारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अध्यक्ष राजु मोरे, उपाध्यक्ष दत्ताशेठ फुले, सचिव शिवाजी सस्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे खुशाल पुरुंदरे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments