१९ ऑक्टोबर २०१९
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात पंधरापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले आहेत. एकूण १८ उमेदवार असल्याने एका यंत्रावर १५ उमेदवार आणि ‘नोटा’ चा पर्याय देणे शक्य आहे. त्यामुळे दोन मतदान यंत्र वापरावी लागणार आहेत. हे बॅलेट युनिट कंट्रोल युनिटला जोडण्यात येते. एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची नावे बसतात. निवडणुकीला उभे असणाऱ्या सर्व उमेदवारांची नावे टाकल्यांनतर सर्वात शेवटी बॅलेट युनिटवर ‘नोटा’ चा पर्याय देण्यात येतो.
विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राचा वापर केला जाणार आहे. यामध्ये ‘ईव्हीएम’वर उमेदवाराचा फोटो देखील बॅलेट युनिटवर असणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी-उंटवाल यांनी दिली.
पिंपरी मतदारसंघात १८ उमेदवार – प्रत्येक केंद्रावर असणार २ मतदान यंत्र
RELATED ARTICLES