Friday, June 13, 2025
Homeताजी बातमीपिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना...

पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना विजयी करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते माजी महापौर – आझम पानसरे

पिंपरी (16 ऑक्टोबर 2019) :
शहराच्या विकासासाठी पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते तथा पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांनी येथे केले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी पानसरे यांच्या प्राधिकरण येथील निवासस्थानी मुस्लिम बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पानसरे बोलत होते. या बैठकीस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, जगदीश शेट्टी, नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक राजाराम कापसे, प्रशांत कापसे, मुस्लिम उलेमा कौन्सिलचे सदर मौलाना फैज अहमद, कार्याध्यक्ष मौलाना हाजी नसीबउल्लाह, मुफ्ती आबीद रजा, उलेमा कौन्सिलचे महासचिव मौलाना नय्यर नूरी तसेच हाजी गुलाम रसूल सय्यद, मोहम्मद अली सय्यद, मेहबूब शेख, लतीफ सय्यद, शफीक शहा, याकूब खान, एजात खान, निहाज शेख, युसुफ कुरेशी, राजू मुलानी, समीर खान मौलाना अजीबी आदी उपस्थित होते.
पानसरे म्हणाले की, अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीत त्यांना केवळ 2 हजार 235 मतांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, पराभव झाल्यानंतरही गेली पाच वर्ष ते सातत्याने समाजातील विविध घटकांच्या संपर्कात आहेत. मुस्लिम बांधवांनीच नव्हे तर समाजातील विविध घटकांनी पिंपरी मतदारसंघातून बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन पानसरे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments