२ डिसेंबर २०२०
पिंपरी चिंचवड शहरात आज दि.२ डिसेंबर रोजी २४० जणांना कोरोनाची लागणं झालेली आहे. यामध्ये शहरातील २२३ तर शहराबाहेरील १७ जणांचा समावेश आहे.आज मागील २४ तासात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९२७७४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८८९७२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १६४२ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – चिंचवड (७९ वर्षे), पिंपरी (३५ वर्षे) ०२ स्त्री – चिखली (७४ वर्षे), थेरगांव (८२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – खेड (८० वर्षे), सोलापुर (८० वर्षे), देहुगाव (६८ वर्षे) ०२ स्त्री – जुन्नर (६५ वर्षे), देहुरोड (७१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
वैद्यकिय विभाग, पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच बाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे , बाहेर पडताना सामाजिक अंतराचे पालन करावे.तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियंमांचे काटेकोरपणे पालन करावे.