१८ नोव्हेंबर ,
पिंपरी-चिंचवड महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून नगरसेविका माई ढोरे यांनी तर उपमहापौरपदासाठी क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांनी अर्ज भरला आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पिं.चिं. नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशीव खाडे,महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापौरपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका माई काटे यांनी तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक राजू बनसोडे यांनी अर्ज भरला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेता विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक भाउसाहेब भोईर, जावेद शेख, वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने सोमवारी महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. २२ नोव्हेंबरला महापौर, उपमहापौर पदाची निवड होणार आहे.