Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवड महापालिकेने ६ गावांसाठी नगररचना योजना (टीपी स्किम) तयार करण्याचे निश्चित केले

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ६ गावांसाठी नगररचना योजना (टीपी स्किम) तयार करण्याचे निश्चित केले

१० नोव्हेंबर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहा गावांसाठी नगररचना योजना (टीपी स्किम) तयार करण्याचे निश्चित केले असून, पिंपरी शहराच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण राबविण्याच्या अनुषंगाने त्यासाठीची अधिसूचनाही जाहीर केली आहे. यामध्ये पुनावळे, चिंचवड, रावेत, चिखली, बोऱ्हाडेवाडी, थेरगाव गावांतील सुमारे एक हजार १५७ हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. शहर विकास योजनेअंतर्गतच (डीपी) नगररचना योजना (टीपी) राबविण्यात येणार आहे. त्याबाबतची प्राथमिक माहिती पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वर्षभरापूर्वी अहमदाबाद अभ्यास दौऱ्याच्या कालावधीत दिली होती. शहराची विकास योजना १९९५ पासून अस्तित्त्वात असताना अंमलबजावणी करताना अनेक आरक्षणे विकसित आली नाहीत. भूसंपादनातील अडथळे, निधीची कमतरता ही त्यामागील प्रमुख कारणे होती. ‘डीपी’ राबविण्याच्या प्रक्रियेत काहींचा फायदा होत असताना अनेकांचा तोटाही होत होता. त्यामुळे चांगल्या पद्धतीने विकास करायचा असल्यास टाउन प्लॅनिंग (टीपी) किंवा लँड पोलिंग (एलपी) यांचा उपयोग केला जातो. त्या अनुषंगाने आरक्षणे विकसित करण्याचे धोरण ‘टीपी’मध्ये ठेवलेले आहे. वास्तविक, जून २०१९ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत १५ गावांमध्ये योजना राबविण्याचे स्पष्ट केले होते. त्यामध्ये वरील सहा गावांव्यतिरिक्त चऱ्होली, किवळे, ताथवडे, मामुर्डी, डुडुळगाव, मोशी यांचाही समावेश होता. याशिवाय पिंपरी, पिंपळे सौदागर, चिंचवड, वाकड आदी गावांतील काही क्षेत्रांवर योजना राबविण्याची उपसूचना दिली होती. परंतु, पहिल्या टप्प्यात केवळ सहा गावांतील एक हजार १५७ हेक्टर क्षेत्रावर योजना राबविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. त्याबाबतचा चतुःसीमासह नकाशा पालिकेच्या नगररचना विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असे स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments