Sunday, July 14, 2024
Homeताजी बातमीपिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी माई ढोरे विजयी,उपमहापौरपदी तुषार हिंगे यांची बिनविरोध निवड

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी माई ढोरे विजयी,उपमहापौरपदी तुषार हिंगे यांची बिनविरोध निवड

२२ नोव्हेंबर – सविस्तरवृत्त,

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने, तर उपमहापौरपदी नगरसेवक तुषार हिंगे यांची बिनविरोध निवड झाली. उषा ढोरे यांना शहराच्या 26 व्या आणि सातव्या महिला महापौर म्हणून बहुमान मिळाला आहे.

पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांनी कामकाज पाहिले. सकाळी अकरा वाजता निवडणुकीला सुरूवात झाली. त्यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माई काटे यांनी माघार घ्यावी, यासाठी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी प्रयत्न केले. परंतु, ते निष्फळ ठरले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. अखेर प्रत्यक्ष झालेल्या मतदानात ढोरे यांना 81, तर राष्ट्रवादीच्या स्वाती उर्फ माई काटे यांना 41 मते पडली. त्यामुळे माई ढोरे यांनी स्वाती काटे यांचा 40 मतांनी पराभव करून विजयी झाले. मतदान प्रक्रियेत अपक्षांनी भाजपला, तर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या बाजुने मतदान केले. परंतु, मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

महापौरपदानंतर शहराच्या उपमहापौरपदासाठी दुपारी बारा वाजता निवडणुकीला सुरूवात झाली. माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ दिला. या मुदतीत बनसोडे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे तुषार हिंगे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments