३०आॅक्टोबर,
पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २६ महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षणाची सोडत नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निघणार आहे. पिंपरी-चिंचवडचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहण्याची शक्यता आहे. या आरक्षित जागेतून निवडून आलेल्या भाजपच्या कोणत्या नगरसेवकाला किंवा नगरसेविकेला महापौरपदाची लॉटरी लागणार याबाबतची उत्सुकता शहरवासीयांमध्ये असून डिंसेबर महिन्याच्या दुसरया आठवड्यात पर्यंत नव्या महापौरांची निवड होऊ शकते.
विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील २६ महापालिकांच्या महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत महापौरपदांच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित होईल. राज्याच्या नगरविकास खात्याने महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची तयारी पूर्ण केली आहे. आता फक्त तारीख निश्चित होणे बाकी आहे.
पिंपरी-चिंचवडचे सध्याचे महापौर राहुल जाधव यांची मुदत १४ सप्टेंबर रोजी संपलेली आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीमुळे तीन महिने म्हणजे १४ डिसेंबरपर्यंत मुदत वाढली आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे महापौर निवडण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी, माघारीची मुदत ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यानंतर १४ डिसेंबरपर्यंत महापौरपदाच्या निवडीसाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे.
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत ?
RELATED ARTICLES