Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीपिंपरीत पहिले ‘शब्दधन जीवन गौरव राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलन’

पिंपरीत पहिले ‘शब्दधन जीवन गौरव राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलन’

८ नोव्हेंबर
शब्दधन जीवन गौरव काव्यमंचातर्फे आयोजित पहिले शब्दधन जीवन गौरव राज्यस्तरीय बाल-कुमार साहित्य संमेलन येत्या १२ नोव्हेंबर रोजी आचार्य आत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर स्वागताध्यक्ष मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार आहेत.
हे एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलन १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार असून, संमेलनासाठी राज्यभरातून अडीचशेहून अधिक पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालक, शिक्षक, साहित्यिक यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
स्वागताध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले, की संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. कोणताही विद्यार्थी अशा उपक्रमांपासून दूर राहता कामा नये. यातून मुलांवर निश्चितच समाजोपयोगी व जीवनावश्यक संस्कार होतील.
संमेलनात ग्रंथदिंडी उदघाटन, शब्दधन सन्मान, बाल नृत्याविष्कार, बक्षीस वितरण, जीवन गौरव पुरस्कार वितरण, शब्दधन पुस्तक भेट योजना, संमेलनाध्यक्षांसोबत बाल साहित्यिकांचा थेट संवाद, नाट्याविष्कार, कथाकथन, कविता ते गाणी, बाल शब्दाविष्कार- बालकांचे कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य समन्वयक प्रा. संपत गर्जे यांनी दिली.
यावेळी स्वागताध्यक्ष अरुण पवार, दिगंबर शिंदे, राहुल इंगळे, प्रा. प्रशांत शेळके,सोमनाथ वाघ, उमेश कुंदे आदी समन्वयक समिती सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments