१९ नोव्हेबंर
पवना धरणात पुरेसा पाणीसाठी असून टंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.शहरात दररोज 500 एमएलडी पाणी पुरवठा करुनही शहरातील उंच सखल आणि शेवट नळधारकांपर्यंत पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे अवैध दुबार नळजोडधारक, खासगी टॅंकर माफिया, बांधकाम व्यावसायिक, हाॅटेल चालक आणि वाॅशिंग सेंटर चालकांवर लक्ष ठेवले आहे. त्यांनी महापालिकेचे पाणी चोरुन घेतल्याचे निर्दशनास आल्यास त्यांच्यावर फाैजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहे.
हर्डिकर म्हणाले की, शहरातील अनधिकृत नळजोडधारकांनी अधिकृत करावे, अन्यथा अनधिकृत नळजोड अधिकृत करुन सक्तीने वसुली करणार आहे. दुबार नळजोड जोडणी केलेल्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात येईल. दोन इंच असणा-यावर नियमानूसार कनेक्शन देण्यात येईल. तसेच व्यावसायिक नळ कनेक्शनाचे सर्व्हे करण्यात येईल. याकरिता हाॅटेल चालक, वाॅशिंग सेंटर चालक, बांधकाम व्यावसायिक आणि खासगी टॅंकर चालक हे महापालिकेचे पाणी चोरत असतील, तर त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील.
शहरातील सोसायटीधारकांना पाण्याच्या नियोजनासाठी 15 दिवसाची मुदत देण्यात येईल. त्यांनी खालीच टाकी बांधावी, तसेच मोटारीने पाणी चोरुन ते सोसायटीच्या वरील टाकीवर चढवण्यात येते. त्या मोटारी देखील लवकरच जप्त करण्यात येतील. पहिल्यादा सर्व्हे करुन कारवाई होईल. याकरिता स्वतंत्रे पथके नेमणूक करुन ह्या मोटारी जप्त करतील. अवैध नळजोडणी तोडणे आदी कारवाईस पोलिसाची मदत घेणार आहे.
त्यानंतरही दोन महिन्यात पाणी पुरवठ्याचे योग्य अमंलबजावणी व नियोजन न केल्यास कनिष्ठ व उपअभियंता, कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त हर्डिकर यांनी सांगितले.