Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीपहिल्या T20 सामन्यात भारताचा पराभव, बांग्लादेश विजयी

पहिल्या T20 सामन्यात भारताचा पराभव, बांग्लादेश विजयी

४ नोव्हेंबर
विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बांगलादेशच्या मालिकेकडे पाहत असलेल्या भारतास सलामीलाच धक्का बसला. प्रदूषणामुळे जास्तच चर्चेत राहिलेल्या या लढतीत मुशफीकर रहीमने दमदार अर्धशतक करीत भारतास हार पत्करण्यास भाग पाडले. त्यामुळे भारतास बांगलादेशविरुद्ध प्रथमच ट्‌वेंटी 20 लढतीत हार पत्करावी लागली.
दिल्लीच्या खेळपट्टीवरून चेंडू कमी वेगाने येतो, पण तिथे आयपीएलच्या लढती खेळण्याचा अनुभवही उपयोगी पडला नाही, त्याच वेळी ही फलंदाजी कशी असावी हे मुशफीकरने दाखवले. त्याने सौम्या सरकारसह 60 आणि महमदुल्लासह 30 धावांची भागी करीत बांगलादेशला विजयी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments