१६ डिसेंबर
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने दिलेले २९० धावांचे आव्हान वेस्ट इंडिजच्या संघाने ८ गडी राखून पूर्ण केले. वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हिटमायरची १३९ धावांची खेळी आणि शाय होपने केलेल्या नाबाद १०२ धावांच्या जोरावर विंडीजने भारतावर सहज विजय मिळवला. या विजयाबरोबरच वेस्ट इंडिजने मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
विंडीजचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायरने केलेल्या १३९ धावा आणि शाय होपच्या नाबाद १०२ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या वनडेत भारतावर ८ गडी राखून मात केली. हेटमायरने १०६ चेंडूत १३९ धावा केल्या. यावेळी त्याने ११ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार ठोकले. तर होपने १५१ चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या. यात त्याने ७ चौकार व एक षटकार ठोकला. या दोघांनी केलेल्या धावांच्या जोरावर विंडीजने हा सामना केवळ दोन गडी गमावून जिंकला. या विजयाबरोबर वेस्ट इंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा वनडे सामना बुधवारी १८ डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये खेळवला जाणार आहे.